स्वामी समर्थ महाराज प्रागट्य दिन:

चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी महाराजांचा प्रागट्य दिवस सबंध दिवस पूजन व अर्चन करून साजरा केला जातो. संध्याकाळी भजन व भक्तिसंगीत सादर करण्यास येतात.स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी:

चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पूजा, आराधना व आरती करण्यात येते. सकाळी ९.३० ते १.०० मध्ये समाराधना करण्यात येते. संध्याकाळी ८.०० वाजता पालखी चे पण आयोजन करण्यात येते.गुरु द्वादशी:

अश्विन वद्य द्वादशीचा दिवशी गुरुद्वादशीचा उत्सव पूजन व अर्चन करून साजरा केला जातो. गुरुद्वादशीच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी ८.०० वाजता पालखी चे आयोजन करण्यात येत.रंगअवधूत जयंती:

नारेश्वरवासी श्री रंगअवधूत महाराजांचा वाढदिवस पण कार्तिक शुक्ल नवमीच्या दिवशी पूजन, लघुरुद्र, पालखी इत्यादि कार्यक्रमा द्वारा साजरा केला जातो. सकाळी १०.०० ते १.०० मध्ये नाना प्रकारांच्या अत्तरांने श्री रंगअवधूत महाराजांचा पादुकांवर अभिषेक केला जातो. ह्यादिवशी सुद्धा संध्याकाळी ८.०० वाजता पालखी चे आयोजन करण्यास येत. श्री रंगअवधूत महाराजांचे अनेक गुजराती भक्त ह्या उत्सवात भाग घेतात.दत्त जयंती :

दत्त जयंती हा स्वामी समर्थ मठात साजरा होणारा सगळ्यात मोठा उत्सव आहे. हा उत्सव मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमे पर्यंत साजरा करण्यात येतो. ह्या काळात काकड आरती, महा आरती, मधुकरी आणि संध्याकाळी विडा आणि शेजारती अश्या विविध प्रकाराने पूजन-अर्चन करण्यात येत.

दत्त जयंती च्या दिवशी खालील कार्यक्रम सादर होतात
१. काकड आरती - सकाळी ६. ०० ते ७. ००
२. आरती - सकाळी ८. ००
३. आरती, दत्तबावनी ई. - दुपारी ११. १५
४. भजन- दुपारी ४. ०० ते ६. ००
५. दत्त जन्म आणि किर्तन - संध्याकाळी ६. ००
६. आरती - संध्याकाळी ७. ०० ते ८. ००

दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी पालखी सकाळी ८. ०० वाजता आणि एक आठवड्याच्या आत महाप्रसाद असतो.गुरु प्रतिपदा :

गुरु प्रतिपदेचा दिवस संपूर्ण दिवस पूजन-अर्चन करून साजरा केला जातो. संध्याकाळी पालखीच आयोजन करण्यात येत.शैलगमन यात्रा:

ज्या दिवशी श्री नृसिंहसरस्वती स्वामींनी श्रीशैल साठी प्रस्थान केलं तो दिवस शैलगमन यात्रेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. शैल गमन यात्रेचा दिवस संपूर्ण दिवस पूजन-अर्चन करून साजरा केला जातो. संध्याकाळी पालखीचे आयोजन करण्यात येत.मंदिरातील दैनिक कार्यक्रम (गुरुवार शिवाय)

१. आरती - सकाळी ८. ००
२. आरती - दुपारी ११. १५
३. आरती - संध्याकाळी ७. ००

दर गुरुवारचे कार्यक्रम
१. आरती सकाळी - ८. ००
२. अभिषेक, आवर्तन आणि लघुरुद्र- सकाळी ८.३० ते १०. ००
३ आरती, दत्तबावनी ई.- दुपारी ११. ३०
४. भजन - संध्याकाळी ५. ०० ते ७. १५
५. महाआरती - संध्याकाळी ७. ३० ते ९. ००

दर्शनाची वेळ

१. सकाळी ६. ३० ते १२. ३०
२. संघ्याकाळी ४. ०० ते ९. ३०-->