श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज


श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे श्रीमद् नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे अवतार मानले जातात. त्यांच्या अवताराची कथा अशी आहे. एकदा एक लाकूडतोड्या एका मुंग्यांच्या वारूळावर वार करू लागला जिथे श्रीमद्नृसिंहसरस्वती स्वामी ३०० वर्षापासून तप करीत होते. अचानक त्या लाकूडतोड्याने त्याचा कुऱ्हाडीवर रक्त पाहिले. तो ते मुंग्यांचे वारूळ स्वच्छ करू लागला आणि त्याला एक योगी तप करित असतांना दिसले. तो लाकूडतोड्या भीतीने थरथर कापू लागला. ते योगी समाधीतून बाहेर आले व लाकूडतोड्याला म्हणाले ," माझी एका विशिष्ट कामा साठी प्रगट होण्या ची वेळ आलेली आहे. ही देवांची ईच्छाआहे ”. ते योगी दुसरे कुणी नव्हते परंतु स्वताः श्री स्वामी समर्थ महाराज होते ! लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडी मुळे त्यांचा मांडी वरील निशाण त्यांच्या काही जवळच्या सेवकांने पाहिले होते.

अधिक वाचाश्री वामनबुआ रावजी वामोरीकर


श्री वामनबुआ रावजी वामोरीकर हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकनिष्ठ भक्तां पैकी एक होते. हे तथ्य सिद्ध करणारी एक घटना बडोद्यामध्ये घडली. बडोद्या मध्ये असतांना वामनबुआंचे स्वास्थ्य वारंवार बिघडु लागले. ते अनेक रोगांनी ग्रस्त होते. या काळात त्यांनी स्वामींना त्यांच्या स्थिती बद्दल पत्र पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु वामनबुवांना त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वेदनांनी अत्यंत त्रस्त झाल्या मुळे वामनबुआंनी बडोदे येथील सुरसागर नावाच्या तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय केला. जेव्हा ते सुरसागर मध्ये उडी घेणार होते त्याच वेळी श्री स्वामी समर्थ महाराज स्वताः तिथे त्यांच्या समोर प्रगट झाले !! त्यांनी वामनबुआंना थप्पड मारली आणि म्हणाले ,"रे मुर्खा! प्रारब्धातल्या प्रत्येक दुःखाला तोंड देण भाग असत.सहज समाधी घेण्याच्या ऐवजी तु जलसमाधी घेत आहेस?

अधिक वाचामठ विषयी


श्री वासुदेवराव (उर्फे भाऊ) कडुस्कर हे श्री स्वामी समर्थ मठा चे संस्थापक होते. ह्या मठाच्या स्थापने मागे एक खुप मोठे दैवी रहस्य आहे. श्री भाऊ ह्यांनां श्री स्वामी समर्थ महाराज स्वताः ह्या स्थळी उपस्थित आहे ह्या बाबतीची प्रचिती हवी होती. त्यांना एक दैवी संकेत मिळाला की तारकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या घुमटाच्या भागावर स्वामींच्या दोन मूर्त्या आहेत. त्यांनी त्या दोन्ही मूर्त्या खाली आणल्या. परंतु एका दैवी घटनेच्या भाग स्वरूपे त्यातील एका मूर्तीस तड गेली आहे असं आढळल. तेव्हा तिथे एक पवित्र आवाज आला की, " मी स्वताः ह्या दुसऱ्या मूर्ती मध्ये उपस्थित आहे". म्हणुन जिथे स्वामी समर्थ महाराज स्वताः उपिस्थत झाले होते त्याच ठिकाणी त्या दुसऱ्या मूर्तीची स्थापनेचा निर्णय केला. ही वस्तुस्थिती श्री वासुदेवराव कडुस्कर ह्यांनी श्रीमंत गायकवाड महाराज (बडोदे) ह्यांना विस्तृतरूपाने सांगितली व मूर्तीची मागणी केली. श्रीमंत गायकवाड महाराज (बडोदे) ह्यांनी श्री वासुदेवराव कडुस्करांची स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची मागणी मंजूर केली.

अधिक वाचा<

गॅलरीजुने मंदिर
महाराजा समरजितसिंह गायकवाड ह्यांचा हस्ते आरती
दत्तजन्माच्या दिवशीची आरती आणि पालखीअधिक प्रतिमा-->